येरवडा । उपनगर भागात वाहनचोरी करणारी टोळी गजाआड करण्यात येरवडा पोलिसांना यश आले असून चार जणांना अटक केली आहे. याप्रकरणात दोन चोरटे अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक रामदास ढसाळ (28 रा. श्रीगोंदा) विशाल बाळासाहेब शेटे (19, रा. राहुरी)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून दोन आरोपी अल्पवयीन आहेत.
वडगाव शेरीतील सैनिकवाडीतील फिर्यादी ओमप्रकाश राजपुरोहित यांचे वाहन चोरीला गेले होते. पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, खडकी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत तांबे, पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन, गुन्हे शाखेचे अशोक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल लोहार, गणेश कुताळ, पोलीस पथक अशोक गवळी, मनोज कुदळे, अजीज बेग, संतोष बढे, एच.सी. साबळे, पी.सी. सरवदे, पी. एन. मुसळे यांनी सापळा रचून चार आरोपींना अटक केली असता त्यांना आरोपीकडून स्वीफ्ट कार, व्हिडीओकॉन व नोकियाचा असा 4 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले. पुढील तपास उपनिरीक्षक अनिल लोहार करत आहेत.