येळकोट येळकोट जय मल्हार!

0

जळगाव। खंडेरायाचा जयघोष अन् भंडार्‍याची उधळण, जुने जळगाव परिसरात गेल्या 141 वर्षाची परंपरा म्हणजे महादेवाचे प्रतिरूप असलेले खंडेरायाच्या बारागाड्या प्रसिद्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांची परंपरा असलेल्या बारागाड्या एकादशीला जुने जळगाव परिसरातील पांझरापोळ भागातून काढण्यात आल्या होत्या. साला बादाप्रमाणे नागरिकांनी खंडेराव मंदिर तसेच बारा गाड्याचे महत्व असल्याने दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. येळकोट येळकोट जय मल्हार या जय घोषकरीत सारा पांझरापोळ परिसर दुमदुमला होता. तरुण कुढापा मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षा पासून पोलीस पाटील यांना सोबत घेऊन पारंपरिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

खंडेरायाची पूजा
गावच्या मारोतीला मान बारागाड्या ओढण्याचे आगोदर जुनेजळगाव मधील खंडेरायाचे पूजन करण्यात आले. म्हाळसा देवीला भरीत भाकर तर भानू देवीला कोंबड्याचा नैवेद्य चढविण्यात आला. कार्यक्रमात प्रथा म्हणून कोणत्याही प्रकारचे संकट नको म्हणून गावाच्या मारोतीला पूजन करून मान देऊन नैवेद्य देण्यात आला. चैतन्यमयी वातावरणावरणात सायंकाळी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी भाविकांकडून केला जाणारा जल्लोष अन उत्साह पाहण्यासारखा होता. जुन्या जळगावातील पांझरापोळ चौकातर्फे 141 वर्षांपासून खंडेराव महाराजांच्या यात्रेनिमित्ताने बारागाड्या ओढण्याचा पारंपरिक कार्यक्रम पार पाडण्यात आला.

तरुण कुढापा मंडळाच्या सहकार्याने ओढण्यात येतात बारागाड्या
पांझरापोळ चौकापासून ध्वजासह पदाधिकार्‍यांनी काढली मिरवणूक

यांनी घेतले परिश्रम
आज सकाळी खंडेराव महाराजांची पूजा-अर्चा करण्यात येऊन भगत जगन सुका चौधरी यांची जुन्या जळगावातील पांझरापोळ चौकापासून ध्वजासह पदाधिकार्‍यांनी मिरवणूक काढली. त्यानंतर सायंकाळी सहाला पोलिसपाटील प्रभाकर पाटील यांच्या उपस्थितीत भगत चौधरी व त्यांचे सहकारी रामकृष्ण काळे, पंडित पाटील, सुनील चौधरी, दिनेश धांडे, सुमित चौधरी, नाना महाजन, शेखर अत्तरदे आदींच्या मदतीने बारागाड्या खंडेरायाच्या जयघोषात व भंडार्‍याची उधळण करत ओढण्यात आल्या होत्या. यावेळी जळगाव शहरासह जुन्या जळगावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.