येळकोट… येळकोट…जय मल्हार

0

नंदुरबार । येळकोट… येळकोट…जय मल्हारच्या गजरात नंदुरबार तालुक्यातील काकर्दे गावात श्री खंडेराव महाराजांच्या यात्रेत बारागाड्या लांगल ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा यात्रोत्सव पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या काकर्दे येथे खंडेराव महाराजांची यात्रा यावर्षीही रविवारी उत्साहात पार पडली. सकाळपासूनच भाविकांनी खंडेराव महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी वाघ्या मुरळींना सजवून गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या चौकात एकामागून एक अशी बारा गाड्यांची रांग तयार करण्यात आली. सायंकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान बन्सीलाल महाजन या भक्ताने ही बारा गाड्यांची लांगल सुमारे पाचशेहून अधिक मीटरपर्यंत ओढली. या लांगलचे दर्शन घेण्यासाठी भाविक नागरिकांनी काकर्दे गावात मोठ्या संख्येने गर्दी केली होती.