येवतीच्या दाम्पत्यास मारहाण : दोघांविरुद्ध गुन्हा

0

बोदवड- तालुक्यातील येवती येथील दाम्पत्यास मारहाण केल्या प्रकरणी दोघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नंदा समाधान लोखंडे (रा.येवती, ता.बोदवड) या विवाहितेच्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी संजय बाळकृष्ण पाटील, श्रीराम रामचंद्र महाजन यांनी 4 रोजी सायंकाळी पाच वाजता फिर्यादीच्या घराजवळ बखळ जागा सोडून द्या या कारणावरून फिर्यादीलसह तिच्या पतीला अश्‍लील शिवीगाळ करून गावात राहू देणार नाही, जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. तपस हवालदार विलास महाजन करीत आहेत.