बोदवड- तालुक्यातील येवती येथे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून दिड लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी बोदवड पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक पन्नालाल जैस्वाल (60, येवती) हे आपल्या वृद्ध आईसह येवतीत राहतात. 19 रोजी सकाळी 11 ते दुपारी चार दरम्यान घरात त्यांची आई असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील 65 हजारांची रोकड, पाच ग्रॅमच्या चार व तीन ग्रॅमची एक सोन्याची अंगठी तसेच 25 हजारांची दहा ग्रॅमची गहू पोत असा एकूण एक लाख 47 हजार पाचशे रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला. तपास नाईक भूषण कोल्हे करीत आहेत.