पुणे । महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या येवलेवाडीच्या विकास आराखड्याला (डीपी) शनिवारी (दि.१६) होणार्या शहर सुधारणा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभेत हा डीपी आयत्या वेळी दाखल करून त्याला मान्यता देण्याची शक्यता आहे. येत्या २३ सप्टेंबरपर्यंत हा डीपी राज्यसरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
शहराच्या जुन्या हद्दीचा आणि २३ गावांचा डीपी तयार करण्यात आला आहे. त्यानंतर महापालिका हद्दीत येवलेवाडी या गावाचा समावेश झाला. त्यामुळे या गावाचा स्वतंत्र डीपी पालिका प्रशासनाने तयार केला. हा डीपी शहर सुधारणा समितीकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. यावर शहर सुधारणा समितीमध्ये सातत्याने चर्चा होऊन त्यावर विविध मुद्यांवर चर्चा झाली आहे. शहर सुधारणाच्या शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार्या डीपीमध्ये यावर चर्चा होऊन मान्यता मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर सर्वसाधारण सभेत हा डीपी आयत्यावेळी दाखल करून त्याला मान्यता देण्याची शक्यता आहे. येत्या २३ सप्टेंबरपर्यंत हा डीपी राज्यसरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
येवलेवाडीच्या डीपीमध्ये एकूण क्षेत्राचा विचार करता निवासी क्षेत्र कमी आहे. बीडीपी, वन खात्याची जागा, मिलिटरीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या डीपीमध्ये ३७हून अधिक आरक्षणे ठेवण्यात आली आहेत.