नवी दिल्ली : येस बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)पदी रवनीत गिल यांची निवड झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने गिल यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.
रवनीत गिल सध्या डॉएशे बँक इंडियाचे सीईओ आहेत. एक मार्चपर्यंत पदभार सांभाळणार आहेत. रवनीत गिल १९९१ पासून डॉएशे बँकेत आहेत. त्यांना कॅपिटल मार्केट, ट्रेजरी, फायनन्स, फॉरेन एक्सचेंज, रिक्स मॅनेजमेंट आणि खासगी बँकिंगचा अनुभव आहे. दरम्यान, रवनीत गिल यांच्या नियुक्तीनंतर येस बँकेच्या शेअरमध्ये १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
येस बँकेत सध्या सीईओ पदावर राणा कपूर आहेत. सप्टेंबर २०१८ मध्ये आरबीआयने येस बँकेला निर्देश दिले होते की, सध्याचे सीईओ राणा कपूर यांच्या कार्यकाळ कमी करुन ३१ जानेवारी २०१९ पर्यंत केला जाईल. आरबीआयने येस बँकेच्या एनपीएचे अंदाजपत्र बनविले होते. त्यामध्ये येस बँकेच्या आकडेवारीत तफावत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आरबीआयने राणा कपूर यांचा कार्यकाळ कमी करण्याचे निर्देश दिले होते.