पिंपरी । महाराष्ट्र योग परिषद, अमरावती यांच्या सहयोगाने पुणे जिल्हा योग संस्थेतर्फे 12 व 13 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. म्हाळसाकांत विद्यालयात होणारी ही स्पर्धा 8 ते 35 आणि त्यापुढील एकूण सात वयोगटात होणार आहे. शनिवारी मुले आणि पुरूष, तर रविवारी मुली आणि महिलांसाठी होणार्या या स्पर्धेतील विजेता संघ राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. अधिक माहितीसाठी मनोज काळे, रमेश मांडवकर, विवेक साबळे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.