योगा करण्यासाठी गेले अन् सकाळीच चोरट्यांनी घर फोडले

0

मोहाडी रस्त्यावरील गुंजन मंगल कार्यालयासमोरील घटना ः रोकड, दागिण्यांसह 82 हजाराचा ऐवज लांबविला

जळगाव– नेहमीप्रमाणे योगा करण्यासाठी महिला घरुन गेली, अवघ्या दोन तासात योगा करुन परतली असता, घर फोडून चोरट्याने रोख रक्कम, दागिणे व मोबाईल असा 82 हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान याच परिसरातील विनोबा नगरात चोरट्यांनी 2 रोजी सायंकाळी चेतन अशोक पिंगळे यांच्या राहत्या घरातून दोन मोबाईल लांबविले आहेत.

मोहाडी रोडवरील गजानन महाराज महाराचे मंदिर आहे. या मंदिराच्या बाजूला गुंजन मंगल कार्यालयासमोर सुनिता रविंद्र पाटील हे पती रविंद्र पाटील यांच्यासह वास्तव्यास आहे. त्यांचा मुलगा तेजस हा पुण्याला नोकरीला असून तेथेच राहतो. 3 रोजी रविंद्र पाटील हे कराडे येथे गेले होते. त्यामुळे सुनिता पाटील ह्या एकट्याच घरी होत्या. 4 रोजी सकाळी 5.30 वाजता उठल्यावर सुनिता पाटील ह्या नियमित प्रमाणे आदर्शनगरातील लॉयन्स क्लब येथे योगासने करण्यासाठी घराला कुलूप लावून गेल्या. योगा करुन 7.30 वाजेच्या सुमारास परतल्या असत्या. घराचे कुलूप तुटलेले तर घरात कपडे, देव्हार्‍यातील देव व इतर वस्तू असा सामान अस्ताव्यस्त पडलेला असल्याने चोरीची झाल्याची घटना समोर आली.

25 हजारांची रोकडसह दागिणे, मोबाईल लांबविला

दोन ते अडीच तासापर्यंत घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने घरातील देवघरात असलेल्या पर्समधून 25 हजार रुपये रोख, 10 ग्रॅम 15 हजार रुपयांची सोन्याची पांचाली, 5 ग्रॅमच्या प्रत्येकी 3 तीन अशा 25 हजार 500 रुपये किमतीच्या अंगठ्या, 5 ग्रॅमची 7 हजार 500 रुपये किमतीची मनी मंगळसूत्र असलेली सोन्याची पोत, 3 ग्रॅमचे 4 हजार रुपयांचे कानातले, अर्धा ग्रॅमची 1 हजार रुपयांची नाकातली सोन्याची फुली, 2 हजार रुपयांचा चांदीचा छल्ला व चांदीचे दोन शिक्के, 5 हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 82 हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी सुनिता पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून दोन मोबाईल लंपास

शिरसोली रोडवरील विनोबा नगरात चेतन अशोक पिंगळे यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्याने मोबाईल लंपास केल्याची घटना घडली. एमआयडीसी पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विनोबानगरातील गुंजन मंगल कार्यालया जवळच चेतन पिंगळे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहेत. गुरुवार (ता.2) रोजी संध्याकाळी सहा वाजता अज्ञात चोरट्याने त्याच्या घरात बेडरुम मधुन ओपो कंपनीचा (8 हजार) एक आणि व्हिवो कंपनीचा दुसरा (4 हजार ) असे दोन मोबाईल चोरुन नेले. पिंगळे यांच्या तक्रारीवरुन आज एमआयडीसी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हेशोध पथक संशयीतांचा शोध सुरु आहे.