पिंपरी : कर्नाटक स्टेट अमॅच्युर योगा असोसिशनतर्फे व योगा फेडरेशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित द्वितीय फेडरेशन कप व आंतरराष्ट्रीय योगा मोहत्सवात महाराष्ट्राला 14 पदके मिळाली. तर, सुशांत तरवडे याने तीन सुवर्ण पदके पटकाविली. धर्मस्थळ येथे आयोजित स्पर्धेचे उद्घाटन योगा फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अशोककुमार अगरवाल, वीरेंद्र हेगडे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत देशातील 28 राज्यासह इराण, व्हतनाम येथील योगपटू असे 450 स्पर्धक सहभाग झाले होते. महाराष्ट्रा संघाबरोबर संघ व्यवस्थापक म्हणून अनिता पाटील, प्रशिक्षक म्हणून जतीन सोळंकी, महाराष्ट्र योगा असोसिशनचे चंद्रकांत पांगारे उपस्थित होते.
यांनी मिळवले यश
या स्पर्धेत देवदत्त भारदे, सुशांत तरवडे, चंद्रकांत पांगारे, श्रेया कंधारे आदींनी यांनी यश संपादन केले. तसेच आंतरराष्ट्रीय योगा महोत्सवात देवदत्त्त भारदे, सुशांत तरवडे यांनी बक्षीस पटकाविले. या यशस्वी स्पर्धकांचे महाराष्ट्र योगा असोसिशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज, कार्यकारी अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, अनिता पाटील यांनी अभिनंदन केले.