योगींनी घेतली संजय दत्तची भेट

0

लखनऊ : लोकसभा निवडणूक २०१९ पूर्वी भाजपने ‘संपर्क फॉर समर्थन’ नावाने एक मोहीम सुरू केली आहे. या अभियानाची सुरुवात भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईतून केली होती. अमित शहा यांनी माधुरी दीक्षितची भेट घेतली होती. दरम्यान उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये अभिनेता संजय दत्तची भेट घेतली. संजय दत्त सध्या आपला आगामी सिनेमा ‘प्रस्थानम’च्या शुटिंगसाठी लखनऊमध्ये आहे. हेच निमित्त साधत योगींनी संजय दत्तची भेट घेत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी समर्थन मागितले. ही भेट प्रदीर्घ काळ सुरू होती.

संजय दत्तचा ‘प्रस्थानम’ हा एक तेलगु सिनेमाचा हिंदी रिमेक असेल. यामध्ये संजय एका नेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तर या सिनेमात त्याच्या पत्नीच्या भूमिकेत मनीषा कोइराला दिसणार आहे. तसेच यात जॅकी श्रॉफ, चंकी पांडे यांच्याही प्रमुख भूमिका असतील.