नवी दिल्ली – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वडील आनंदसिंह बिष्ट यांचे दीर्घ आजाराने आज दिल्लीत निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांना उपचारासाठी दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) येथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आपण शोकग्रस्त असून लॉकडाउनमुळे आपल्या पित्याच्या अंत्यसंस्काराला आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केले आहे.
वडील गेल्याचे मला दुःख आहे त्यांचे अंतिम दर्शन घेण्याची इच्छा देखील आहे. कोरोना या जागतिक महामारी विरुध्दच्या लढाईत मी उत्त्तर प्रदेश मधील २३ कोटी जनेतेच्या हितासाठी मी जावू शकत नाही. हे दुःख करत बसायला आता माझ्याकडे वेळ नाही. हे कोरोना संकट गेले की घरी येऊन जातो असे स्पष्ट करून अंत्यसंस्कारावेळी लॉकडाऊनचे पालन करुन कमीत कमी लोकांच्या उपस्थीतीत अंत्यसंस्कार करावेत, असेही त्यांनी आईला लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.
एम्समध्ये महिनाभरापासून सुरु होते उपचार
उत्तराखंडमधील पौडी जिल्ह्यातील पंचूर गावचे रहिवासी अशलेले आनंदसिंह बिष्ट यांची गेल्या महिन्यात आजारी पडले होते. त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. इथे त्यांना एबी वॉर्डात ठेवण्यात आले होते. गॅस्ट्रो विभागाचे डॉ. विनीत आहूजा यांचे पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मात्र, रविवारी त्यांची तब्येत खालावली होती. आनंदसिंह बिस्ट यांना दीर्घ काळापासून मूत्रपिंडाचा त्रास होता. डॉक्टरांनी त्यांचे डायलिसीस देखील केले होते. पौडी येथे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना सुरुवातीला जॉलीग्राँटच्या हिमालयन हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले होते. मात्र, इथे त्याच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याचे पाहून त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. आनंदसिंह हे उत्तराखंडमध्ये फॉरेस्ट रेंजर होते. ते सन १९९१ मध्ये निवृत्त झाले होते. त्यानंतर ते गावी येऊन राहू लागले.