पटणा – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी व्हॉट्स अॅपवर मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून धमकी देणार्याचा शोध सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या पोलीस मुख्यालयाच्या व्हॉट्स अॅप नंबरवर गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता एक मेसेज आला. या मेसेजमध्ये, मी मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवून देणार आहे, ते समाजचे शत्रू आहेत असे लिहिले होते. हा मेसेज आल्यानंतर पोलीस दलात खळबळ माजली. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी संबंधित मोबाईल नंबरचे तपशील शोधायला सुरुवात केली आहे. त्याचप्रमाणे गोमतीनगर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी धीरज कुमार यांनी तक्रार दाखल केली आहे.