लखनौ – उत्तर प्रदेश शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. इयत्ता १० वीच्या परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या टॉपरला दिलेला १ लाख रूपयांचा चेक बाऊंन्स झाला आहे. मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या हस्ते टॉपरला जाहीर कार्यक्रमात हा चेक देण्यात आला होता.
आलोक मिश्रा असे टॉपरचे नाव आहे. योगी सरकारने जाहीर केलेल्या बक्षिसानंतर सर्वस्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू होता. मात्र, चेक बाऊन्स झाल्यानंतर त्याचा हिरमोड झाला. उलट, दंडाचा भुर्दंडही त्याला सहन करावा लागला. उत्तर प्रदेश शिक्षण विभागाचे वाभाडे निघाल्यानंतर योगी प्रशासनाने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य करत चेक बदलून दिला.