योगी यांनी शब्द पाळला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय

0

लखनऊ- उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक प्रचारकाळात दिलेला शब्द पाळला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य भाजपा नेत्यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत योगी आदित्यनाथ यांनी 2 कोटी 25 लाख शेतकऱ्यांचे एक लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक घेतली. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातही उत्सुकता होती ती शेतकरी कर्जमाफीविषयीच्या निर्णयाकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेतील आपल्या भाषणात भाजप सत्तेवर येताच पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेईल असे म्हटले होते.

उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यासर्व निर्णयांमध्ये सर्वात महत्वाचा निर्णय शेतकरी कर्जमाफीचा आहे. या निर्णयामुळे उत्तरप्रदेश सरकारला 36 हजार कोटींची तरतुद करावी लागणार आहे.