जळगाव – शहरातील जुना खेडी रस्त्यावर असलेल्या योगेश्वर नगरातील भर रस्त्यावर असलेले एटीएम फोडण्याचा प्रयत्न करण्यात
आल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. योगेश्वर नगरात मुख्य रस्त्यावर असलेल्या एका इमारतीमध्ये अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे.
गुरूवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी सकाळी 6.30 च्या सुमारास फिरण्यासाठी निघालेल्या एका
व्यक्तीचे लक्ष गेले असतात सीसीटीव्ही कॅमेरे बाहेर पडलेले दिसून आले.