योगेश मुंडकरने जिंकली परमेश्‍वरी कुस्ती

0

नांदेड । महाराष्ट्रात प्रसीध्द असलेल्या श्री परमेश्‍वर मंदिर हिमायतनगरच्या यात्रेतील मानाच्या कुस्तीत योगेश मुंडकरने दिल्लीच्या पैलवानास लोळविले. प्रथम क्रमांकाची कुस्ती जीकणा-या पैलवानासाठी 7001 रुपयाचे बक्षीस बजरंग दलाच्या वतीने ठेवण्यात आले होते. योगेश मुंडकर आणि हरीश शेलगाव यांच्यात कुस्ती झाली. यात हरीशला चित करून योगेश आखाड्यात दाखल झाला. त्यानंतर विशाल डख (दिल्लीवाला) या पैलवानासोबत फायनल कुस्ती विश्र् हिंदू परिषदेचे नांदेड जिल्हा प्रचारक कृष्णाजी देशमुख यांच्याहस्ते लावण्यात आली. विशालला चित्थ करून योगेशने सलग दुसर्‍या वर्षी सुद्धा अव्वल नंबरचा मान मिळविला.

येथील पैलवानांचा होता सहभाग
यात्रा कमेटीचे अध्यक्ष लक्ष्मणरावजी शक्करगे, उपाध्यक्ष सुभाष शींदे, सचीव संजय माने, मंदिर समीतीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय वाळके यांच्या उपस्थीतीत झाल्या. हदगाव, हिमायतनगर, किनवट, भोकर, इस्लापूर, नांदेड, परभणी, ढाणकी, उमरखेडच्या पैलवानांचा समावेश होता.