योग्य स्क्रिप्ट निवडताना मुलीगी खूप मदत करते-अमिताभ बच्चन

0

मुंबई- बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचाकडे पहिले जाते. वाढदिवसानिमित्त त्यांनी आज काम करण्यासाठी कोणाची मदत मिळते याविषयी खुलासा केला आहे. बिग-बी म्हणतात चित्रपटासाठी काम करतांना योग्य स्क्रिप्ट निवडताना त्यांची मुलगी श्वेता बच्चन नंद यांची त्यांना मोठी मदत मिळते असे ते म्हणतात.

काल श्वेता बच्चन यांची पहिली कादंबरी “पॅराडाइज टावर्स”चे प्रकाशन करण्यात आले. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी ती अत्यंत चोखपणे पार पाडते. देशातील घटना-घडामोडींवर मतप्रदर्शन करायला तिला आवडते. आम्ही घरात देखील याबाबत चर्चा करीत असतो असे बिग-बी म्हणतात.