योग दिन कार्यक्रमात उत्फुर्तपणे सहभागी

0

नवापूर । शहरात 21 जुन जागतिक योग दिन मोठ्या संख्येने उपस्थितीने व उत्साहात साजरा झाला. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यलय, सार्वजनिक ठिकाणे योग शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अनेक योगाचे धडे शिकून समाधान व्यक्त केले. महिला, लहान मुले, युवा वर्ग, वयोवृद्ध या योग दिन कार्यक्रमात उत्फुर्त पणे सहभागी झाले होते.आज आंतरराष्ट्रीय योगदिना निमित्त अस्तित्व ग्रुप, पतंजली महिला योग समिती,संवेदन फाउंडेशन व युवक कार्यक्रम क्रीडा मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र,नवापूर जि, नंदुरबार मार्फत निमित्त सरदार चौक येथे एक दिवसीय प्रातः योग शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी या शिबिरात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. यावेळी महानंदा पाटील जिल्हा प्रभारी महिला पतंजली योग समिती,सहयोग शिक्षक मंगला चव्हाण ,पल्लवी खैरकर यांनी योगासनांची प्रात्यक्षिके करवून घेतली.

जयश्री पाटील, सुचिता साळुंके, प्रभा पाटील,अंजु सोनार ,डॉ. मृदुला भांडारकर, मीनाक्षी सोनार, सुनंदा तांबोळी,स्वयंसिद्ध तालुका प्रमुख ज्योती चौधरी, अस्तित्व ग्रुप, संवेदन फाउंडेशन डॉ.मंदा मोरे, तनिष्का मंदा गावित, सिमा काळे, प्रियांका पाटील व अस्तित्व ग्रुपच्या सर्व महिलांनी सहभाग नोंदवला. यावेळी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वय अतुल निकम,नाना पाटील,कुलकर्णी काका यांचे मार्गदर्शन लाभले. नेहरू युवा केंद्राचे तालुका प्रतिनिधी सुनिल पवार,अर्चना गावित यांचे सहकार्य लाभले शिबिरात योगाचे अनेक प्रकार, योगासने, आसने शिकुन ते आत्मसात केले. पहाटे सकाळी शहरात जिकडे तिकडे योगा करण्यासाठी सर्व सज्ज झाले होते. यावेळी मौलिक मार्गदर्शन करण्यात आले.