योग शिक्षक परीक्षेत प्राजक्ता पांगारे प्रथम

0

पिंपरी : नुकत्याचझालेल्या योग शिक्षक परीक्षेत प्राजक्ता पांगारे तर योग पंच परीक्षेत मीना पवार यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पुणे डिस्ट्रिक्ट योगा अ‍ॅण्ड फिटनेस इन्स्ट्यिूटच्या वतीने पंचांची गुणवत्ता व कौशल्यवाढीसाठी मे महिन्यात ही परीक्षा घेण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय योग पंच चंद्रकांत पांगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील 26 योग शिक्षकांनी परीक्षा दिली होती.

महापौरांच्या हस्ते सत्कार
योग शिक्षक परीक्षेत 31 शिक्षक सहभागी झाले होते. प्राजक्ता पांगारे यांनी प्रथम, तर योगिनी विभांडिक व स्वरदा देशपांडे यांनी द्वितीय, सुकेत शहा व योगिनी महाडिक यांनी तृतीय, जतीन आव्हाड यांनी चतुर्थ तर नीता गोगावले यांनी पाचवा क्रमांक मिळविला. योग पंच परीक्षेत मीना पवार यांनी प्रथम क्रमांक पटकविला. सुकेत शहा यांनी द्वितीय, सुप्रिया बलकवडे व शर्मिला ननावरे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. नीता गोगावले, मेघा झणझणे यांनी चतुर्थ तसेच विद्या महाले यांनी पाचवा क्रमांक मिळविला. पुणे डिस्ट्रिक्ट योगा अ‍ॅण्ड फिटनेस इन्स्टिट्यूट व ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने योग शिक्षकांच्या योग प्रारंभ परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते या योगपटुंचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद निफाडकर, राष्ट्रीय कुस्तीपटू बाबासाहेब तांबे आदी उपस्थित होते.