योजनांचा लाभ जनतेपर्यंत न्या!

0

शिरपूर । भाजपा कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी समस्या जाणून घेवून त्या सोडविण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केल्यास खर्‍या अर्थाने पक्षसेवा व जनसेवा होईल. तसेच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनेक विविध जनकल्याणकारी योजना राबवित असून या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याची आवश्यकता असून तसेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, रोहयो व पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल हे जिल्हयासाठी अनेक योजना आणल्या असून त्या जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम पक्ष कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केले. भाजपा धुळे जिल्हा पदाधिकार्‍यांची बैठक गुलमोहर विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती त्याप्रसंगी ते बोलत होते.

जिल्हयात होवू घातलेल्या 108 ग्रामपंचायत निवडणूकीत त्या त्या तालुक्यातील पक्ष नेत्यांनी लक्ष घालून सरपंच व ग्रामपंचायत सदस्य जास्तीत जास्त निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. यावेळी जिल्हयातील बुथ रचना आढावा घेण्यात आला. जिल्हयातील कार्यकर्त्यांनी 1 हजार 419 बुथ रचना शंभर टक्के पुर्ण केल्याबद्दल पदाधिकार्‍यांचा यावेळी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी सत्कार केला.

जिल्हा बैठकीत यांची होती उपस्थिती
बैठकीला प्रदेश सदस्य अ‍ॅड.संभाजी पगारे, भिमसिंग राजपूत, नारायण पाटील, शेतकरी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, आदिवासी आघाडी प्रदेष सरचिटणीस डॉ.तुळशीराम गावित, आदिवासी नेते मोहन सूर्यवंशी, किशोर सिंघवी, वसंतराव बच्छाव, अरूण धोबी, मनोहर भदाणे, किशोर माळी, प्रा.अरविंद जाधव, भाऊसाहेब देसले, देवेंद्र पाटील, सरला बोरसे, धिरेंद्रसिंह सिसोदिया, मिलींद पाटील, संजय आसापूरे, आबा धाकड, मोतीलाल पोतदार, लिलाबाई सूर्यवंशी, चंद्रकला सिसोदिया, एन.डी.पाटील, प्रताप सरदार, फिरोजअली सैयद, नारायणसिंह जमादार, नवल पाटील, नथू पाटील, प्रा.रमेश खैरनार, किरण चौधरी, अ‍ॅड.राहुल पाटील, जितेंद्र जैन, संजय अहिरराव, राजेंद्र खैरनार, प्रविण महाजन, संजय तायडे, पंकज चौधरी, प्रमोद चौधरी, देवेंद्र देशमुख, महेंद्र पाटील, रविंद्र भोई, नंदु ढोंबरे, अर्जुन महाले,दिग्वीजय गावस्कर, योगेश भामरे, मनोज पाटील, हिंमत पाटील, कैलास गिरासे, भूषण पाटील, विलास खैरनार, अनिल जयस्वाल आदी कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंघवी, सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस वसंतराव बच्छाव, आभार जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी यांनी मानले.