कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कल्याण । पंतप्रधान कौशल्य योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण देण्याबाबतची जाहिरात देत एका दुकलीने दोन महिलांना एकूण १ लाख १६ हजार २५० रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कल्याण पूर्वेकडील काटेमानवली नाका बालाजी हॉस्पिटलच्या वर अविनाश कळंबकर व हेमांगी चौधरी याचे कार्यालय आहे. त्यांनी पंतप्रधान कौशल्य योजनेअंतर्गत मोफत प्रशिक्षण देण्याबाबतची खोटी जाहिरात दिली.
जहिरात देवून गंडवले
चिकणी पाडा परीसरात राहणारी महिला वंदना लोखंडे, सारिका जाधव यांनी जाहिरात पाहुन त्यांना संपर्क केला. अविनाश कळंबकर व हेमांगी चौधरी या दोघांनी जुलै महिन्यांत वंदना लोखंडे यांच्याकडे ४७ हजार ५०० तर हेमांगी चौधरी यांच्याकडे २१ हजार २५० तर विजय गोखले नावाच्या इसमाकडून ४७ हजार ५०० रुपये असे एकूण १ लाख १६ हजार २५० रुपये उकळले. या तिघांनी त्यांच्याकडे अनेकदा प्रशिक्षण कधी देणार याबाबत विचारणा केली. मात्र प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार आहे.