योजना येतात …अन् कागदावरच राहतात

0

जळगाव । केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात मात्र नागरिकांना योजनेचा लाभ मिळत नाही. सर्वसामान्य जनता योजनांपासून वंचित राहत आहे़ योजना येतात अन् कागदावरच राहतात अशी खंत जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सीएससी कार्यशाळेत व्यक्त केले़ गुरुवारी 20 रोजी अल्पबचत भवनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी तहसिलदार अमोल निकम, कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, कृषी उपसंचालक अनिल भोकरे आदि उपस्थित होते़ याकार्यशाळेत स्वत: जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी मार्गदर्शन केले.

31 जुलै पर्यत अर्ज करा: सर्व योजनांची माहिती इंटरनेटवर असल्याने थेट लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहचणार आहे. परंतु जनतेला व्यवस्थित माहिती मिळत नसल्याने तुम्ही जनतेला या योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करा. 31 जूलैपर्यंत जिल्हातील पिक विमा ऑलाईन फार्म भरण्यापासून वंचित राहता कामा नये लोकांना साक्षरकरने गरजेचे आहे. त्यांना शासनाच्या विविध योजना सांगूण त्या त्यांच्या पर्यंत पोहचवा. कॉमन सव्हिर्स सेंटर या कंपनीमार्फत हा उपक्रम राबविला जात असला तरी शासकीय योजनेची पुर्ण माहिती दिली जावी.

60 हजार शेतकर्‍यांनी केली पेरणी: आधारकार्ड, पिकबिमा योजना अशा विविध 162 योजनाचा लाभ शेतकर्‍यांपर्यंत पोहचाव्याा. यात ग्रामसेवक, तलाठी, तहसिल सर्कल याविभागांतुन अधिकारीनी कामे तत्काळ करावी. सर्व शेतकर्‍यानी इन्शुरन्स फार्म भरून घेणे गरजेचे आहे. कारण निर्सगित आपत्ती दुबार पेरणी चे संकट कोसळल्यास ज्या शेतकर्‍यांनी पिक योजना चा फार्म भरला आहे. त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. अशा सुचनाही देण्यात आल्या. 60 हजार शेतकर्‍यानी दुबार पेरणी केलेली असल्याचेही त्यांनी सांगितले़ यावेळी उपस्थिती सीएससीचे सेंटरधारकांना पिक विमा आणि विविध योजना संदर्भात सीएएस कंपनीचे राहुल देवरे यांनी प्रशिक्षार्थीनां मार्गदर्शन केले.