रावेर । पंचायत समिती ग्रामीण विकासाचा केंद्र बिंदु आहे. तळा-गाळातील सामान्य माणसापर्यंत केंद्र व राज्य शासनाच्या योजना पोहचविण्यासाठी अधिकार्यांनी सहकार्य करावे असे प्रतिपादन सभापती माधुरी नेमाडे यांनी रावेर पंचायत समितीत केले. पंचायत समिती सभागृहात नवनिर्वाचित सदस्यांची पहिलीच सर्वसाधारणसभा संपन्न झाली. यात नेमाडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी सानिया नाकाडे, उपसभापती अनीता चौधरी, पंचायत समिती सदस्य कविता कोळी, वैशाली कोळी, प्रतिभा बोरोले, योगिता वानखेडे, धनश्री सावळे योगेश पाटील, जितेंद्र पाटील, जुम्मा तडवी, दिपक पाटील उपस्थित होते.
पहिल्याच सभेला अधिकार्यांच्या दांड्या
येथील पहिल्याच सर्वसाधारण सभेला कामचुकार अधिकार्यांनी दांड्या मारल्यामुळे उपस्थित सदस्यांनी यावर संप्तत प्रतिक्रीया देत तिव्र नाराजी व्यक्त केली. व शो-कॉज नोटीसा देण्याच्या सुचना करण्यात आल्या. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाल्या त्यामुळे पहिलीच सभा दांडीबहाद्दरमुळे चर्चेत राहिली. सर्वसाधारण बैठकीला पाणी पुरवठा विभाग, एसटी महामंडळ, पुनर्वसन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागांचे एकही कर्मचारी, अधिकारी उपस्थित नव्हते त्यामुळे पहिल्या बैठकीला गायब असलेल्या अधिकार्यांवर काय कारवाई होते याकडे आता सर्वसाधारण जनतेचे लक्ष लागले आहे.
या अधिकार्यांनी दिला कामाचा आढावा
यावेळी ग्रामीण भागावर विविध शाखा कसे काम करत आहे याचा आढावा प्रत्येकाने उपस्थीतांना करून दिला यामध्ये सिंचन विभागचे अधिकारी बोरोले यांनी केलेले कामे प्रस्तावित कामांचा माहिती दिली तसेच विज विभागाचे गणेश अस्मार, कृषि विभागाचे एस.एस. पवार, बाल विकास प्रकल्पाचे तड़वी, जिल्हा परिषद बांधकाम विभागचे डी.के. पवार, चोपडेकर, नारखेड़े तसेच आरोग्य, पशुसवंर्धन, शिक्षण, विस्तार अधिकार्यांनी आप-आपल्या कामांचा परिचय करून आढावा दिला.
ट्रान्सफार्मरसाठी पैश्यांची मागणी
ऐनपूर परिसरात काही विज विभागाचे कर्मचारी केबल ड्रॉपसाठी तसेच इतर कामांसाठी पैशांची मागणी करून अड़वणूक करतात या कर्मचार्यांवर कारवाईची मागणी पंचायत समिति सद्स्य जितु पाटिल यांनी केली असता तक्रार द्या त्यावर तात्काळ कारवाई करतो असे विज अधिकारीं गणेश अस्मार यांनी सांगितले.