योजनेतून वंचित लाभार्थ्यांना डावलल्याप्रकरणी उपोषण

0

चाळीसगाव । सन 2002 व 2007 मधील इंदीरा गांधी आवास योजनेची प्रतिक्षा यादी शासनाने जाहिर केलेली आहे. त्यामुळे प्रतिक्षा यादीतील वंचित लाभार्थ्यांवर अन्याय झाला असून या वंचित लाभार्थ्यांचा प्रधानमंत्री आवास योजनेत समावेश करावा या मागणी साठी दि 23 मार्च 2017 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसिल कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सदर उपोषणप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती रोहीदास पाटील, बेलगंगा साखर कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन रविंद्र पाटील, माजी जि.प.सदस्य प्रभाकर जाधव यांनी देखील भेट दिली. वंचित लाभार्त्यांच्या न्याय हक्कासाठी लाभार्थ्यांना सोबत घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती तमगव्हाण चे माजी सरपंच किशोर पाटील यांनी दिली आहे.

यावेळी माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक राजीवदादा देशमुख, बाजार समितीचे माजी उपसभापती जालम पाटील, जि.प.सदस्य शशिकांत साळुंखे, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शहराध्यक्ष शाम देशमुख, तमगव्हाण ग्रा.प.माजी सरपंच किशोर पाटील, चाळीसगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष भोजराज पुन्शी, पं.स.सदस्य अजय पाटील, दुध संघाचे संचालक प्रमोद पाटील, बाजार समिती संचालक कल्याण पाटील, शिवाजी आमले, अ‍ॅड.प्रदीप अहिरराव, शेतकी संघाचे संचालक जयाजी भोसले, यशवंत पाटील, उदेसिंग पाटील, दिलीप देशमुख, वसंत आव्हाड, माजी नगरसेवक भगवान पाटील, नगरसेवक सुर्यकांत ठाकुर, दिपक पाटील, बाजीराव दौंड, युवक जिल्हा उपाध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, छगन पाटील, सुभाष पाटील, चितेगाव ग्रा.पं.सरपंच अमोल भोसले, सचिन बाविस्कर, प्रशांत पाटील, अ‍ॅड.शिवाजी बाविस्कर, प्रभाकर पारवे तसेच पदाधिकारी उपस्थित होते. लाक्षणिक उपोषण स्थळी तहसीलदार कैलास देवरे व गट विकास अधिकारी यांनी भेट दिल्या व प्रयत्न करणार असल्याचे  त्यांनी सांगितले.