य. च. मुक्त विद्यापीठाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ

0

मुंबई । यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या सर्व शिक्षणक्रमांचे प्रवेश 27 जूनपासून सुरू करण्यात आले आहेत. मात्र, राज्यातील प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून विद्यापीठ प्रशासनाने प्रवेश मुदतीत वाढ केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता 14 ऑगस्टपर्यंत विनाविलंब शुल्कासह असलेली मुदत 31 ऑगस्टपर्यंत सर्व शिक्षणक्रमांसाठी वाढवण्यात आली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना रुपये शंभर विनाविलंब शुल्कासह 1 ते 15 सप्टेंबरपर्यंत तर रुपये पाचशेसह 16 ते 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

सन 2017-18 या शैक्षणिक वर्षाचे सर्व प्रवेश ऑनलाइन पद्धतीने केले जात असून, विद्यार्थ्यांनी त्यास उत्तम प्रतिसाद दिला आहे. ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या संगणकावर ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येणार नाही, असे विद्यार्थी स्वतः सायबर कॅफेच्या माध्यमातूनही प्रवेश अर्ज भरू शकतात. शिक्षणक्रमांच्या अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या ycmou digitaluniversity. ac अथवा ycmou या संकेतस्थळावर संपर्क साधावा.