रंगली कलगी-तुर्‍यातील जुगलबंदी

0

आंबेगाव : पारगाव शिंगवे तालुक्यातील लोणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नागपंचमी सणाचे औचित साधून या परिसरातील ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी आणि परंपरानुसार आयोजित केलेल्या कलगी-तुर्‍याच्या सामन्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रिमझिम पावसात सुरू असलेल्या या कलगी-तुर्‍यातील शाहिरांमधील जुगलबंदी ऐकण्यासाठी जनसमुदाय उपस्थित होता.

शाहिर रामदास गुंड (पारनेर) व शाहीर नानाभाऊ साळुंके (श्रीगोंदा) यांच्यामध्ये विशेष सामना रंगला त्यांच्या सवाल-जवाबाच्या जुगलबंदीचे उपस्थित श्रोत्यांनी कौतुक केले. लोणी, धामणी, वडगावपीर शिरदाळे, पोंदेवाडी, खडकवाडी, पहाडदरा, सविंदणे, आदी परिसरातील नागरिक व शेतकर्‍यांनी कार्यक्रमांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, राजाराम बाणखिले, भाजपचे तालुका अध्यक्ष जयसिंग एरंडे, खडकवाडीचे सरपंच अनिल डोके, अशोक आदक, बाळशिराम वाळुंज, पिंटू पडवळ, राजेंद्र आदक, अनिल वाळुंज, विविध संस्थांचे प्रतिनिधी, गावचे सरपंच आदी उपस्थित होते.