भुसावळ शहरातील आठवडे बाजारासह किन्हीत बाजारपेठ व तालुका पोलिसांची धडक कारवाई ; आरोपींची जामिनावर सुटका
भुसावळ- आखाजीनिमित्त शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जुगार्यांचा डाव रंगले असतानाच भुसावळात बाजारपेठ पोलिसांनी आठवडे बाजारात छापा टाकत नऊ जुगार्यांच्या मुसक्या आवळल्या तर तालुक्यातील किन्ही येथेदेखील तालुका पोलिसांनी छापा टाकत 9 जुगार्यांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 24 हजार 790 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. आरोपींची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईने जुगार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आठवडे बाजारात जुगाराचा डाव उधळला
भुसावळ- आठवडे बाजार भागातील जुन्या तालुका पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस जुगारी झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असताना बाजारपेठ पोलिसांनी 7 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकून नऊ जुगार्यांच्या मुसक्या आवळल्या. कैलास पंडीत सोनवणे (44), राहुल दत्तु चौधरी (27), राजु नारायण ठोसरे (38), सँलविन विरेंद्र ठाकुर (27), संदीप प्रभाकर चौधरी (25), प्रमोद रमेश सन्याशी (48), हुसेन शहा उर्फ (गुड्या) शाबीर शहा (30), पवन मनोहर चौधरी (27), प्रकाश मधुकर चौधरी (33) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून सहा हजार 690 रुपयांची रोकड तसेच पत्त्यांचा कॅट जप्त करण्यात आला. तपास पोलिस नाईक दीपक जाधव करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे एएसआय अंबादास पाथरवट, पोलिस नाईक थोरात, दीपक जाधव, नरेंद्र चौधरी, कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहुल चौधरी आदींच्या पथकाने केली.
किन्हीत जुगारावर धाड : सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
भुसावळ- तालुक्यातील किन्ही येथे आखाजीनिमित्त पत्त्याचा डाव रंगात आला असताना तालुका पोलिसांनी मध्यरात्री एक वाजेनंतर छापा टाकत नऊ जुगार्यांना अटक करण्यात आली. 18 हजार 100 रुपयांच्या रोकडसह तीन दुचाकी मिळून दोन लाख 28 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उप विभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, पोलिस उपनिरीक्षक गजानन करेवाड, विठ्ठल फुसे, सुनील चौधरी, राजेंद्र पवार यांनी केली आहे.