तळोदा : नवापूरच्या पत्रकारांनी पुढाकार घेऊन रंगावलीचा गाळ काढण्यास सुरुवात केल्यापासून नंदुरबार जिल्ह्यात गाळ काढण्याच्या मोहिमेसाठी वातावरण निर्मिती झाल्याचे गौरवाद्गार जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी काढलेत. जिल्ह्यात पाण्याचे नियोजन व काटकसर आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्राचार्य कमलेश पाटील यांनी सुत्रसंचालन केले तर पत्रकार संघाचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आभार मानलेत.
मान्यवरांच्या हस्ते गाळ काढण्यास शुभारंभ
येथील पालिका प्रशासन व नवापूर तालुका दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील रंगावली नदीपात्रातुन गाळ काढण्याच्या मोहिमेचा शुभारंभ ज्येष्ठ नेते आ. सुरूपसिंग नाईक, माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. तहसीलदार प्रमोद वसावे, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र नजन, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, बांधकाम सभापती हारुन खाटीक, महिला बालकल्याण सभापती सारिका पाटील, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, नगरसेवक दर्शन पाटील, विशाल सांगळे, यश अग्रवाल, बंटी चंदलानी, मंगला सैन प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.
गाळ काढण्याचे तिसरे वर्ष
प्रा. आय. जी. पठाण यांनी आढावा सादर करीत चांगल्या कार्यासाठी नवापूरकर नेहमीच अग्रेसर राहिल्याचे सांगून लोकसहभाग उपक्रमात सर्व व्यवहार धनादेशाद्वारे करुन विश्वासार्हता जपण्याचा प्रयत्न पत्रकार संघाने केल्याचे सांगितले. संघाचे उपाध्यक्ष निलेश पाटील,सचिव महेंद्र जाधव, कोषाध्यक्ष सुधिर निकम,विनोंद सुर्यवंशी, प्रेमेंद्र पाटील,मंगेश येवले, पालिका कार्यालय अधिक्षक मिलिंद भामरे, मंडळ अधिकारी प्रमोद कुळकर्णी, तलाठी विनायक गावीत, महसुल व पालिका प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह सेनेचे तालुका प्रमुख गणेश वडनेरे, माजी नगरसेवक अजय पाटील,हेमंत जाधव, मनिष पाटील, विजय सैन, सुभाष कुंभार आदी उपस्थित होते.