रंगावली नदीचा विनाशकारी महापुर

0

मध्यरात्री महापुराचे तांडव
नैसर्गिक आपत्तीने अनेक घरे वाहुन प्रचंड नुकसान
दोन लोक वाहुन गेले
अनेक लोक, जनावरे वाहुन गेल्याचे भिती

नवापूर । 16 गुरुवारी मध्यरात्री 2 नंतर पावसाने आहाकार करत नवापूरकरांवर संकट आले होते. रंगावलीला विनाशकारी महापुर आला. मध्यरात्री सर्व उध्वस्त करुन गेला. रात्री 2 वाजेचा मध्यरात्री पासुन रंगावलीचे पाणी अचानक वाढुन महापुर आला. सन 1976 नंतर रंगावली प्रकोपली व आपले रुद्र अवतार धारण करत मध्यरात्रीचा काळोख्यात रंगावली काठी असणार्‍या लोकांचे संसार उध्वस्त करुन गेली. भगतवाडी भागातील रंगावली किनारी राहत असलेली सयदा बी काकर वय 50 ही महिला वाहुन गेली. तिचे संपुर्ण घर वाहुन गेले आहे. तिचे मृतदेह सकाळी सापडले. पुरात आपली आई वाहुन गेल्याचे मुलगा व सुन हकीगत सांगत रडत होते. तर येथील मांग समाजातील सर्व घरे वाहुन गेली.यांचा घरी मुलीचे लग्न दोन दिवसा नंतर होते. त्यांचा लग्नाचा सामान पुरात वाहुन गेला आहे. ते उघड्यावर आले आहेत. त्यांचे घरच वाहुन गेले आहे.

जिल्हाधिकारी यांचा समोर येऊन ते रडत आपल्या भावना सांगत होते. मदतीची अपैक्षा करत होते. अनेक लोक ओकसा बोक्सी रडत जिल्हाधिकारी यांचा कडे मदतीची विनंती करत होते. रंगावली नदी किनारी राहत असलेले अनेक लोक महापुरात वाहुन गेल्याची भिती व्यक्त होत आहे. फुलफळी भगतवाडी,महादेव मंदिर, ईदगाह रोड ताईवाडा, शिवाजी रोड मागील भाग आदि रंगावली नदी किनारी राहणार्‍या लोकांचा घरात पाणी शिरुन प्रचंड नुकसान झाले आहे. मोठ मोठ्या इमारती पाण्यात होत्या. त्यांचा खुणा व नुकसान दिसत आहे. नुकसान खुपच भयावह आहे. भगतवाडी व फुलफळी भागातील लोकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. लोक उघड्यावर आले आहेत. घरेच वाहुन गेली.

ढगफुटीचा प्रकार
कुकराण गावात ढगफुटी होऊन पांझर तलावावरुन पाणी गावात शिरले.रायंगण नदीचे पाणी अचानक वाढले व ते पाणी कोळदा व राणीकुंड गावातील घरात पाणी शिरले आहे. बोरझर, नागझरी उकाळापाणी येथील उपनद्याचे पाणी रंगावलीला येऊन महापुर आला आहे.

फुलफळीतील 12 झोपड्या गेल्या वाहून
रंगावली नदी किनारी असलेल्या फुलफळीतील 12 झोपड्या वाहुन गेल्या आहेत. नया होंडा (कंरजी ओवरा) येथील मोठा पुल, देवफळीचा पुल, पीडब्लुडी जवळील पुल सर्व पुल महापुराचा पाण्यात असुन पी डब्लु डी जवळील ब्रिटीश कालीन पुल वाहुन जाण्याची भिती व्यक्त होत आहे. कठडे तुटुन पडले आहे. झाडे, वीज खांब, वीजेची डि पी, घरातील सामान, लाकडे वाहुन नुकसान झाले आहे. रंगावलीचा प्रकोप भयकारी होता. लोकांचे जीव सुदैवाने वाचले.दोन जण वाहुन गेले त्यांची डेट बाँडी मिळाली आहे.पंचनामा सकाळ पासुन सुरु झाला होता. पंचनाम्याची कामे वाढवले असुन प्रांतधिकारी अनिता पठारे नवापूरात तळठोकुन आहेत. परिस्थिती हाताळुन आहेत. सोबत तहसीलदार राजेंद्र नजन, पोलीस निरिक्षक विजयसिंह राजपुत, महसुल, नगरपालिका, पोलीस अन्य प्रशासन अधिकारी मदतीला आहे.

रंगावलीचे पाणी नागझरी बोरझर मार्गावरुन येत. उकाळापाणी प्रतापपुर, बोरझर येथील उपनद्याना वाढत गेले, रायपुर चौक येथे रंगावली नदीचा संगम होतो तेथुन नाल्यातील पाणी मिसळत रंगावली नदीत मिसळतात ते अचालक वाढत जाऊन. मध्यरात्री 3ला रंगावली नदी प्रकोपली पाणी वाढले महापुरात रुपांतर झाले.

दिवस उजेडे पर्यत 6 पर्यत पाणी होते नंतर दुपारी 2 नंतर ते कमी होत गेले. रंगावली नदीचा केळी गावाचा पुढे, नागझरी खोकसा गावाचा पुढे ओढ आहे. तेथील खर्‍या अर्थाने पाणी वाढले. डांग भागातील पाण्याची पातळी वाढत जाऊन रंगावली नदीला महापुर आला. भगतवाडी येथील जि.प.गुजराती शिक्षक संदिप नायका यांची अल्ट्रा गाडी महापुरात वाहुन गेली तर एक इसम महापुरात वाहत जात पुलाजवळ खांबवर लटकत होता. त्याला लोकांनी बाहेर काढले.

जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
जिल्हाधिकारी डा. मल्लिनाथ कलशेट्टी, प्रांतधिकारी अर्चना पठारे रात्री 3 वाजता नंदुरबार येथुन निघुन विसरवाडी गावात जाऊन पाहणी केली नंतर नवापूर येथील गंभीर परिस्थीतीची पाहणी केली .रंगावली नदी किनारी नुकसान झालेल्या घरांची पहाणी करुन पंचनाम्याचे आदेश देत ते सुरु केले.लोकांचा भावना त्यांनी समजुन घेत तातडीने डॉक्टरांची टिम अलर्ट करुन गंभीर परिस्थीती हाताळत नगरसेवक,सामाजिक संस्था,सेवाभावी लोकांची तातडीचे तहसील कार्यालयात बैठक घेऊन मदत कार्य सुरु केले. पंचनाम्याची टिम वाढवुन प्रशासन कामाला लागले आहे.

 

जिल्हाप्रशासनाकडून अलर्ट
दरम्यान नंदुरबार जिल्हातील नवापूरची परिस्थिती मेजर असुन 140 मि मि पाऊस झाल्याची नोंद झाली असुन पाऊसांची अजुन शक्यता वर्तवली जात आहे. परिस्थिती नियत्रंणात आहे. पुर्व पदावर नवापुर येण्यासाठी वेळ लागणार नाही. नवापूर शहरात काही नुकसान नाही फक्त रंगावली नदी किनारी राहणार्याचा घरात महापुराचे पाणी मध्यरात्री शिरुन नुकसान झाले आहे. दरम्यान

आ.सुरुपसिंग नाईक यांनी रंगावली नदी किनारी नुकसानग्रस्थ क्षेत्राची पाहणी केली. जि.प.अध्यक्षा रजनीताई नाईक यांनी ही पहाटे पासुन विसरवाडी, खांडबारा क्षेत्र तसेच नवापूर शहरातील रंगावली नदी किनारी नुकसानग्रस्त्र भागाची पाहणी केली.