मुक्ताईनगर प्रतिनिधी .... खडसे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे शासन व विदयापीठाच्या परिपत्रकानुसार दिनांक एक आक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता एक तास ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम महाविद्यालयाच्या परिसरात राबविण्यात आला.
‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांनी महाविद्यालयाच्या परिसरात स्वतः स्वच्छता करून ‘रंग भगवा त्यागाचा..मार्ग स्वीकारू स्वच्छतेचा’ हा संदेश दिला. या अभियानात उपप्राचार्य चौधरी, प्रा. सरोदे, प्रा. नेहते, प्रा. किनगे, प्रा. साळवे, प्रा. चव्हाण, प्रा. पाटील, प्रा. थोरात, प्रा. अभिषेक पाटील, प्रा. खेडकर, प्रा. छाया खर्चे, प्रा. वंदना चौधरी, प्रा. प्रतिभा ढाके, प्रा. सविता जावळे, भानुदास बढे, पुंजाजी झोपे, सागर चौधरी, विजय जंगले, गणेश शिमरे, राजू जुम़ळे, . संजय करोसिया तसेच महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने सक्रिय सहभाग घेतला. एनएसएसचे स्वयंसेवक नंदन महाजन, चंदन शिमरे, प्रणव पवार, कृष्णकांत भारुडकर, सलोनी भोई, सानिका जावरे अशा असंख्य स्वयंसेवकांनी ‘माझ्यासाठी नव्हे…तुमच्यासाठी हे एनएसएसचे ब्रीदवाक्य उराशी बाळगून स्वच्छता ही सेवा हा उपक्रम यशस्वी करून महाविद्यालयाचा परिसर स्वच्छमय केला. या उपक्रमाचे संपूर्ण संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले तर एनएसएस कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. ताहीरा मीर, प्रा.डॉ. दीपक बावस्कर व प्राध्यापक विजय डांगे यांनी आयोजनात सक्रिय सहभाग घेऊन ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम यशस्वी केला.