चाळीसगाव । ग्रामीण भागातील महिलांनी योग्य व सकस आहारासह भाजीपाला जास्त खाल्ल्याने रक्तक्षय(अॅनेमिया) होत नाही. व गरोदर मातेसह गर्भाचे पोषण चांगले होऊन कुपोषित बालक जन्माला येत नाही, अशी माहिती डॉ. विनोद कोतकर यांनी दिली. जागतिक आरोग्य दिनानिमित्त हातगावला आधारीत महिला आरोग्य शिबिरात ते बोलत होते. संकल्प ते सिद्धी अभियानाअंतर्गत हे आयोजन करण्यात आले होते.
महिला, बालकांची तपासणी
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव अंतर्गत हातगाव येथील उपकेंद्रांत जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने महिला आरोग्य शिबीराचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बबिता कमलापूरकर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ देवराम लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प ते सिद्धी या अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी सर्वांसाठी सार्वजनिक आरोग्य कुठेही कधीही. या घोषवाक्यानुसार ग्रामीण गरोदर महिलांसाठी व बालकांसाठी तपासणी व उपचार शिबिर आयोजित करण्यात आले होते.
मशिन दिली भेट
मान्यवरांचे हस्ते सुरवातीलाच आरोग्याची देवता धन्वतंरीचे पुजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य अतुलदादा देशमुख होते. रुग्णांची तपासणी प्रख्यात स्रीरोगतज्ञ तथा आई फाऊंडेशनचे डॉ. विनोद कोतकर व डॉ.चेतना कोतकर व डॉ.प्रमोद सोनवणे यांनी केली. यावेळी डॉ.कोतकर यांनी सांगितले की, प्रसंगी आई फाऊंडेशनतर्फे तळेगाव आरोग्य केंद्रास फिटल डॉपलर (गर्भाचे ठोके मोजण्याचे मशिन) भेट दिलेे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सोनवणे यांनी डॉ.कोतकर दांपत्याचे आभार मानले.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर पंचायत समिती सदस्या प्रिती विष्णू चकोर, विष्णू चकोर , सरपंच विलास चव्हाण, उपसरपंच अंबादास वाघ, श्री गोरे आप्पासाहेब, भोसले सर, पराग कासार, गोरख राठोड, शिवाजी राठोड आदींसह आरोग्य सहाय्यक एल सी जाधव, सुनंदा महाजन, सरला चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सविता पेंभरे, नितीन तिरमली, अशोक परदेशी, आशा स्वयंसेविका रेखा पांचाळ, मिनाताई नागरे आदींनी परिश्रम घेतले.