कांजुरमार्ग । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार सुनील राऊत यांच्या जन्मदिनानिमित्त कांजुरमार्ग-पूर्व येथील शिवसेना पुरस्कृत व शिवरत्न सेवा संघच्या वतीने उपविभागप्रमुख सुधाकर पेडणेकर आणि शाखाप्रमुख महेश पाताडे यांनी महापालिका शाळा,कांजूर मेन मार्केट याठिकाणी गरजू महिलांना घरघंटी वाटप आणि गरजू रुग्णांसाठी रक्तदान शिबिर अशा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी या कार्यक्रमाचा लाभ अनेक गरजू महिलांनी घेऊन त्यांना मान्यवरांच्या हस्ते घरघंटीचे वाटप करण्यात आले.तसेच रक्तदान शिबिरासदेखील चांगला प्रतिसाद मिळून अनेक प्रौढ-आणि तरुणांनी यावेळी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या.
मान्यवरांची उपस्थिती
सदर कार्यक्रमास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अॅड. श्री लीलाधर डाके, आमदार सुनील राऊत, म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, संदेश उपरकर, संभाजी माने, सुधीर भोसले, गुरूनाथ पेडणेकर, शैलेश तारकर, विनय परब, महेश कदम, गणेश चिकणे तसेच शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.