दादर – स्वा. सावरकर यांच्या मार्सेलिस बंदरातील जगप्रसिद्ध उडीला 107 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकात शुश्रूषा रुग्णालयाच्या सहकार्याने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सावरकरभक्त विक्रांत आजगांवकर यांनी केले. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे आदी उपस्थित होते.