रक्तदान शिबिराचे आयोजन

0

भोसरी : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे गुरुवारी (दि. 21) दिघी -भोसरी येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ताराचंद करमचंदानी व अंगद जाधव यांनी दिली.

राज्यातील रुग्णालयांतून रक्तसाठा कमी पडू लागला आहे. त्यामुळे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी भोसरी परिसरातील नागरिकांना आवाहन करण्यात आले असल्याचे संयोजकांनी सांगितले. तसेच फाउंडेशनतर्फे वर्षभरात जिल्ह्यातून रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे.