रक्तदान शिबिरात 188 रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

भोसरी : येथील संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 188 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुणे झोनलचे प्रमुख ताराचंद कपचंदानी यांच्या हस्ते झाले. यावेळी भोसरी विभागाचे संयोजक अंगद जाधव, सेवादल अधिकारी बाबासाहेब कमाले, जयराम सावंत, मधुकर गोसावी, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. शिबिराच्या उद्घाटनापूर्वी प्रभात फेरी, पथनाट्य, बाईक रॅली आदींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

विविध रक्तपेढींचे सहकार्य
या शिबिरामध्ये ससून रक्तपेढीतर्फे 88 युनीट तर वायसीएम रक्तपेढीतर्फे 49, औंध हॉस्पिटल रक्तपेढीतर्फे 51 युनीट रक्त संकलित करण्यात आले. आरोग्यम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित मोफत आरोग्य तपासणीचा 200 लोकांनी लाभ घेतला. हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चाकण येथील चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार्‍यांनी विशेष सहकार्य केले.