रक्तदान शिबिरात 62 जणांचा सहभाग

0

सेवक संस्थेतर्फे केले आयोजन

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिका सेवक पतसंस्थेच्या सत्तेचाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या पिंपरीतील मुख्य कार्यालयात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 62 जणांनी सहभाग घेतला. संकलित रक्त यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएच) रक्तपेढीस देण्यात आले. उपमहापौर शैलजा मोरे, पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेविका मोनिका कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, सहआयुक्त दिलीप गावडे, मुख्य लेखा परिक्षक कुंभोजकर, आरोग्य प्रमुख मनोज लोणकर, डॉ. निता घाडगे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, पतसंस्थेचे अध्यक्ष आबा गोरे, उपाध्यक्ष संजय कुटे, खजिनदार महाद्रंग वाघेरे, सचिव सीमा सुकाळे, संचालक अंबर चिंचवडे, मनोज माछरे, मधुकर रणपिसे, राजाराम चिंचवडे, सतिश गव्हाणे, नथा मातेरे, रमेश चोरघे, भगवान मोरे, चारुशिला जोशी, महादेव बोत्रे, दिलीप गुंजाळ, यशवंत देसाई, नंदकुमार घुले, पतसंस्थेचे व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर आदी उपस्थित होते. स्वागत आबा गोरे यांनी केले. सूत्रसंचालन मनोज माछरे यांनी केले. तर चारुशिला जोशी यांनी आभार मानले.