रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद

0

भुसावळ । इनरव्हील क्लब आणि बँक ऑफ बडोदा यांच्यातर्फे नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात 22 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. रक्तदान शिबिरानंतर नाहाटा महाविद्यालया मागील समर्थ कॉलनीत 50 रोपे लावण्यात आली. राजीव सहगल, राजेश अग्रवाल, अशोक काबरा, महेश भराडे, सारंग चौधरी, आरती चौधरी, संगीता चांडक, राजश्री कात्यायनी, कमल सचदेव आदी उपस्थित होते.