रक्तदान शिबिर उपक्रम कौतुकास्पद

0

यावल । सार्वजनिक उत्सवात रक्त तपासणीचा उपक्रम राबवणे अत्यंत कौतुकास्पद बाब असून अन्य मंडळांनी या उपक्रमाचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर रांनी येथे केले. शहरातील महाजन गल्लीत न्यू एकता दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने रविवारपासून मंगळवारपर्यंत दररोज सायंकाळी रक्त तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कोळपकर बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, असे उपक्रम राबवणे कौतुकास्पद बाब आहे. रक्ताच्या विविध तपासणी करीता लागणारा खर्च वाचण्यास त्यामुळे मदत होणार आहे.

यांची होती उपस्थिती
पालिकेचे गटनेता राकेश कोलते, नगरसेविका देवरानी महाजन, धीरज महाजन यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सारंकाळी 7 ते 9 रा वेळेत रक्तातील प्रमाण, लिव्हर साठीची रक्ताव्दारे तपासणी, कॅल्शीरम तपासणी, कावीळ व संधीवाताची रक्ताव्दारे तपासणी केली जात आहे.