रक्तदान शिबीर

0

इंदापूर । हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी काँग्रेस व न्हावीगाव येथील मोरया ग्रुपच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 45 जणांनी रक्तदान केले. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर 51 वृक्षांचे रोपण करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे सभापती करणसिंह घोलप, इंदापूर तालुका विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष तुषार खराडे, उपाध्यक्ष रोहीत मिसाळ, राहुल भिटे, सरपंच नंदा अवघडे, बापूराव मारकड आदी उपस्थित होते. याप्रसंगी घोलप म्हणाले की, नुसतेच फोटो पुरते झाडे न लावता त्याचे व्यवस्थित संगोपन करणे ही तेवढेच महत्वाचे आहे, असे घोलप यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन सरचिटणीस तुषार भोसले, वैभव शिंदे, रवींद्र रासकर, आकाश घारे, ओंकार रासकर, सौरभ घोगरे, अमोल कुंभार, प्रतीक घोगरे, अस्लम मुलाणी व मोरया फ्रेंडस ग्रुपच्या सदस्यांनी केले होते.