भुसावळ : रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्याविषयी फेसबुक या सोशल मीडिया वेबसाईटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी जि.प. सदस्य रवींद्र नाना पाटील यांचे बंधू प्रमोद नाना पाटील यांच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी संजय निवृत्ती पाटील यांनी फिर्याद दिली आहे. प्रमोद पाटील यांनी खासदार रक्षा खडसे यांच्या विषयी 27 मे रोजी फेसबुकवर पोस्ट टाकून ती काही वेळानंतर डिलीट केल्याचे भाजपा पदाधिकारी यांच्या लक्षात आल्यानंतर तालुका पोलीस ठाण्यात पदाधिकाऱ्यांनी धाव घेत गुन्हा नोंदवला.