शहादा । शेतकर्यांना पाणी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे रखडलेले सिंचन योजना पूर्ण करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. उत्तर महाराष्ट्रत सिंचनाचा विविध योजना पूर्ण करुन सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर देऊन शेतकर्यांना न्याय देण्याचे काम करावयाचे असल्यासचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांनी केले. येथील सातपुडा साखर कारखान्याचा 43 वा ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ दि,4 नोव्हेंबर रोजी राज्यचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना, गिरिष महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. संगणीकृत ऊस वजन काटाचे पूजन पालक मंत्री तथा पर्यटन मंत्री ना.जयकुमार रावल यांचे हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील हे होते.
सिंचनाचे नियोजन मागील सरकारने बिघडविले
कारखान्याचा गाळप शुभारंभ कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ओबीसी सेल प्रदेशध्यक्ष विजय चौधरी, माजी जिप उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, जिप समाज कल्याण सभापती आत्माराम बागले, बाजार समितीचे चेअरमन सुनिल पाटील. रवींद्र महाराज पोलिस जिल्हा प्रमुख संजय पाटील, सहकार साहेब रावल, माजी आ. रामक्रुष्ण पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पाटील , उपनगराध्यक्षा रेखा चौधरी, जगदीशभाई पाटील. ,रवींद्र राऊळ , व्हा. चेअरमन प्रेमसिंग अहेर सह कार्यकारी संचालक पी.आर. पाटील व संचालक मंडळ उपस्थित होते. गिरिष महाजन म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात ही 10 कारखाने असून फक्त फैजपुरचा कारखाना सुरु आहे. सातपुडा कारखाना सतत चांगल्या स्थितीत चालू आहे. सिंचनासाठी मागील सरकारने नियोजन बिघाडले म्हणून धरणाचे पाणी शेतकर्यांच्या शेतात गेले नाही. 21 शे टेंडर नवीन धरणावर काढले आहे. बिलो सिस्टीम बंद केली. क्रांतिकारी निर्णय सिंचन क्षेत्रात आणले. तापी भुराई योजना 3 वर्षात साकार होणार असुन केंद्रा कडून तसा निधी उपलब्ध झाला आहे.