मुंबई-गेल्या चार वर्षापासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्यांना अखेर शुक्रवार चा मुहूर्त मिळाला आहे. राज्य शासनाने विविध विकास महामंडळे, मंडळे व प्राधिकरणाच्या रिक्त असलेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती पदांवरच्या एकूण 21 नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यात निष्ठावंतांना पुन्हा डावलले असून शिवसेनेला खुश करण्याचा प्रयत्न केला आहे.
हे देखील वाचा
जाहीर केलेल्या नियुक्त्यांमध्ये 10 महामंडळे, 6 मंडळे, 2 प्राधिकरण व एका आयोगातील पदाचा समावेश आहे. यामध्ये हाजी अरफात शेख यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ति केली आहे तर राष्ट्रवादीचे आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. सेनेचे आशिष जयस्वाल यांची महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ अध्यक्षपदी तर प्रकाश नकुल पाटील महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर सेनेचे नितिन संपतराव बानगुडे-पाटील यांची महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ अध्यक्षपदी वर्णी लागली. उदय सामंत यांची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अध्यक्षपदी तर ज्योती दिपक ठाकरे यांची महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांची शहर व औद्योगिक विकास महामंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.