धुळे । नगाव शिवारातील टाईल्स गोडाऊनमधील रखवालदाराची हत्या प्रकरणांचा उलगडा करण्यात धुळे पोलिसांना मोठेच यश आले आहे.त्याबाबतची माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली. हत्त्रा करून मार्बोनेट टाईल्सचे 150 बॉक्स दुकानाच्याच मालट्रकमधून चोरट्यांनी लंपास केले होते. गुन्हा पश्चिम देवपूर पोलिसात दाखल झाला होता. तसेच अवधान एमआयडीसी मधून चोरट्यांनी ट्रकच्या कॅबीनवर झोपलेल्या दोघांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून ट्रकची चाबी घेऊन सोयाबीन भरलेला मालट्रक पळवून नेला होता.
संशयितांवर ठेवली पाळत
नमूद गुन्ह्यातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेण्याचे मोठेच आव्हान पोलिसांसमोर होते. वरीष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली नगाव येथील चोरी व खूनाचा गुन्हा देवपूर पश्चिम पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. त्या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सरीता भांड यांनी अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत विविध मार्गांवरील पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीचे फूटेज तपासले. सराईत गुन्हेगारांची चाचपणी केली. संशयीतांवर पाळत ठेवली. मोबाईलचे लोकेशन घेतले.
सोयाबीन ट्रक लूट प्रकरण
सपोनि सरीता भांड यांनी आरोपींना अटक करुन शिरपूरच्या चाकडू व बुडकी गावातून मार्बोनेट टाईल्सचे बॉक्स जप्त केले. शिरपूर ग्रामीणचे सपोनि किरणकुमार खेडकर व सहकार्यांची मदत झाली. दुसर्या गुन्ह्यात पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे, डीवायएसपी हिंमतराव जाधव, पोनि रमेशसिंग परदेशी, एपीआय राठोडांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी सोयाबीन ट्रक लूट प्रकरणी 7 आरोपींकडून 19 लाख 67 हजार 800 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात सुनिल भानुदास बोरसे रा. तामसवाडी ता. साक्री याला अटक केली.
वाहन अडवून चालकास मारहाण
त्यात आरोपी अन्वरखाँ नासिरखाँ पठाण (वय 38) रा. उंदीरखेडा ता. पारोळा ह. मु. आझादनगर धुळे व सुनील भानुदास बोरसे (वय 39) रा. दत्ताणे गव्हाणे ता. शिंदखेडा ह. मु. मोहाडी यांनी अशोक लेलँड गाडीचा वापर करुन पारोळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक वाहन अडवून त्यातील चालकाला मारहाण करुन रस्तालूट केली. त्या चालकाने आरोपींना ओळखले. त्यावरुन अन्वरखाँ नसीरखाँ पठाण आणि सुनिल भानुदास बोरसे यांचा मागोवा काढत त्यांना अटक करण्यात आली. आरोपींनी सुरेश पित्या पावरा व नाना देवसिंग पावरा (दोघ रा. चांदसूर्या) यांची नावे सांगितली. ही कारवाई करतांना पोलिसांनी पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीचे फूटेज तपासले होते. व संशरितांवर पाळत ठेवत मोबाईलची रेकॉर्ड चेक करून कारवाई केली.