रघुकुल शैक्षणिक ट्रस्टतर्फे शालेय चित्रकला स्पर्धा

0

दैनिक जनशक्ति आहे स्पर्धेचा मीडिया पार्टनर

डोंबिवली । सध्याच्या स्पर्धात्मक आणि गतिमान वेगात विद्यार्थ्यांना विविध कलांची जाण होण्यासाठी नानाविध उपक्रमांचे आयोजन करणार्‍या रघुकुल शैक्षणिक ट्रस्टतर्फे कल्याण- डोंबिवलीस्तरीय आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन गटांमध्ये 10 सप्टेंबर रोजी होणार्‍या या स्पर्धेसाठी दैनिक जनशक्ति मिडीया पार्टनर असणार आहे. इयत्ता 2 री ते 4 थी, इयत्ता 5 वी ते 7 वी आणि इयत्ता 8 वी ते 10 वी असे स्पर्धेसाठी गट असणार असून, प्रत्येक शाळांमधून या गटांमध्ये जास्तित जास्त 10 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. प्रत्येक गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका 7 सप्टेंबरपर्यत स्विकारल्या जातील.

स्पर्धेत विनामूल्य प्रवेश देण्यात येणार असून चित्र काढण्यासाठी कागद आयोजक पुरवणार आहेत. याशिवाय स्पर्धकांना कुठल्याही रंगमाध्यमात चित्र रंगवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. ही शालेय चित्रकला स्पर्धा साईकृपा सहकारी पतपेढी लिमीटेड आणि गद्रे बंधूनी पुरस्कृत केली आहे. स्पर्धेच्या प्रवेशिका रघुकुल शैक्षणिक ट्रस्ट, मैत्री रघुकुल 401, बिल्डींग क्रमांक 1, जे.के.वुमन हॉस्पिटलच्या वर, सारस्वत बँकेसमोर, भगतसिंग रोड, डोबिवली, पूर्व ( संपर्क 0251-2434425, 9833605191), गद्रे बंधू, अंबिका हॉटेल शेजारी फडके रोड , डोंबिवली पूर्व (संपर्क 9833181735), साईकृपा सहकारी पतपेढी, शॉप क्रमांक 5, खडकवान निवास, गुप्ते क्रॉस रोड नंबर 3, डोंबिवली, पश्‍चिम.

असे आहेत स्पर्धेतील गटनिहाय विषय
इयत्ता 2 री ते 4 थी
(सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत)
विषय : गणपती किंवा
पाण्याखालील जग.

इयत्ता 5 वी ते 7 वी (दुपारी 1 ते 2.30 वाजेपर्यंत)
विषय : स्वप्न किंवा पावसाळी सहल.

इयत्ता 8 वी ते 10 वी (सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत)
विषय : सामाजिक संदेश देणारे पोस्टर, स्वच्छता अभियान

विजेत्यांना रोख पुरस्कार
1. प्रत्येक गटातील प्रथम विजेत्यास रुपये 1000 रोख, सन्मानचिन्ह, इतर शैक्षणिक साहित्य.
2. प्रत्येक गटातील दुसर्‍या क्रमांकास रुपये 700 रोख, सन्मानचिन्ह, इतर शैक्षणिक साहित्य.
3. प्रत्येक गटातील तिसर्‍या क्रमांकास रुपये 500 रोख, सन्मानचिन्ह, इतर शैक्षणिक साहित्य.
4. याशिवाय प्रत्येक गटातील पाच उत्तेजनार्थ विजेत्यांसाठी प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, इतर शैक्षणिक साहित्य
5. प्रत्येक गटातील पहिल्या क्रमाकांच्या विजेत्याच्या शाळेतील कलाशिक्षकास कलागौरव कलाशिक्षक पुरस्कार.