चेन्नई:रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. अखेर आज ही प्रतीक्षा संपली. लाइका प्रॉडक्शनने रजनीकांत यांच्या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक आणि नाव जाहीर केले. या चित्रपटाचे नाव आहे, ‘दरबार’. आधी हा चित्रपट ‘थलाइवा १६७’ या नावाने प्रदर्शित होणार होता. पण नंतर हे नाव बदलून ‘दरबार’ असे या चित्रपटाचे नामकरण करण्यात आले.
‘दरबार’मध्ये रजनीकांत पोलिस अधिका-याच्या भूमिकेत आहेत. ‘आप यह फैसला ले सकते हैं कि मैं आपके साथ अच्छा रहूं, बुरा रहूं या बहुत खराब रहूं,’ असे या पोस्टरवर लिहिले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. या चित्रपटातही रजनीकांतचे सुपर-डुपर डायलॉग्स ऐकायला मिळणार आहेत.
ए.आर. मुरूगदास दिग्दर्शित हा चित्रपट २०२० मध्ये पोंगलच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. ‘व्हाय दिस कोलावरी’ फेम संगीत दिग्दर्शक रविचंदर यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. रजनीकांत या चित्रपटात डबलरोलमध्ये दिसणार असल्याचे सांगितले जाता आहे. एक पोलिस अधिकारी आणि एक सामाजिक कार्यकर्त्या अशी दुहेरी भूमिका ते वठवणार आहेत.