मुंबई : सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यांचा बहुचर्चित चित्रपट ‘२.०’ काल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राजनीकांतची क्रेझ पाहण्यासारखी असते. त्याच्या प्रत्येक चित्रपटाला लोक भरभरून प्रेम देतात. चित्रपटात राजनीकांत आहे म्हंटल कि तो चित्रपट सुपरहितच असं निर्माते आधीच समजून जातात. ‘२.०’च्या वेळी हीच क्रेझ चित्रपटगृहातही पाहायला मिळाली. स्क्रीनवर जशी रजनीकांतची एन्ट्री झाली, चाहत्यांनी धुमधडाक्यात साजरी केली. त्याच्या एन्ट्रीवर नाचण्याकरिता चित्रपट चक्क ३ मिनिटे थांबविण्यात आला होता.
https://twitter.com/RajiniFansTeam/status/1067984109127888896
सोशल मीडियावर चाहत्यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या इच्छेखातर चित्रपट पॉज होणारा ‘२.०’ हा कदाचित पहिलाच असेल. यावरुनच चाहत्यांमध्ये रजनीकांतची असलेली क्रेझ आणि त्याच्यावर असलेले प्रेम हे दिसून येत आहे.