रजनीकांत- नवाजुद्दीन पहिल्यांदाच एकत्र

0

मुंबई: साऊथचा सुपरस्टार रजनीकांत ‘काला’ या चित्रपटानंतर चाहत्यांसाठी आणखी एक खास भेट घेऊन येत आहेत. रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘पेट्टा’ असं या चित्रपटाचं नाव असून यामध्ये रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाच्या माध्यमातून नवाजुद्दीन दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पदार्पण करत आहे.

‘पेट्टा’च्या मोशन पोस्टरमध्ये रजनीकांत यांचा अॅक्शन अवतार पाहायला मिळत आहे. कार्तिक सुब्बाराज दिग्दर्शित या चित्रपटात सेतूपती, नवाजुद्दीन, सिमरन, त्रिशा, सुब्बाराज आणि रविचंदक यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.