चेन्नई : सुपरस्टार रजनीकांतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता हीच सेवा अभियानाला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. स्वच्छता हीच खरी देवाची भक्ती आहे, असे सांगत रजनीकांत पंतप्रधानांच्या खांद्याला खांदा लावून स्वच्छतेच्या अभियानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. या अभियानाला देशभरातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असताना सुपरस्टार रजनीकांतनेही स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या या अभियानाला दाद दिली आहे.