मुंबई : अनुष्का शर्मा सध्या ट्रोल्सचा पुन्हा एकदा शिकार झाली आहे. नुकतच ती रजनीगंधा पर्ल्सची ब्रँड अम्बॅसेडर बनली आहे. आता तिने आपल्या ट्विटर हँडलवर जाहिरातीचा एक व्हिडिओ शेअर केलाय. पण नेटीझन्सना तिचे रजनीगंधा प्रॉडक्ट्सचा ब्रँड अम्बॅसेडर होणे आवडलेले नाही.
अनुष्काने या व्हिडिओसोबत सोशल मीडियावर लिहिले आहे, “लेट गॉडेस शाईन ! अच्छे की चमक…सिल्वर पर्ल्स रजनीगंधा पर्ल्स. परंतु तिचा हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेचच विरोधी प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. “एक युजर लिहितो, “एवढाच प्रचार करणे बाकी…कोहलीपासून काही तरी शिक..आरोग्यास हानिकारक असे लिहिलेल्या पदार्थांचा तो कधीच प्रचार करीत नाही.”
दुसरा नेटकरी म्हणतो, “तुझ्यासारखी मुलगी फक्त बोलते पण असल्या जाहिराती करते. पेटा पुरस्कार मिळाला हे फक्त दाखवण्यासाठी असते. असल्या पदार्थांचा प्रचार करुन खरे काय ते दाखवलेस. देव तुझे भले करो.” अशा प्रकारे विरोधी अनुष्काला ट्रोल करत आहेत.